गोपनीयता धोरण ·
Privacy Policy
शेवटचा बदल: 15 August 2026
यशोगाथा ("आम्ही", "आमचे") ही वेबसाइट yashogatha.com चालवते आणि महाराष्ट्रातील माणसांच्या आणि गावांच्या गोष्टी सांगणारे व्हिडिओ तयार करते. हे धोरण सांगते की आम्ही कोणती वैयक्तिक माहिती गोळा करतो, का करतो, आणि त्याबाबत तुम्ही काय करू शकता. हे धोरण आम्ही मुद्दाम सोपं ठेवलं आहे. काही समजलं नाही, तर आम्हाला hello.yashogatha@gmail.com वर संपर्क करा.
आम्ही काय गोळा करतो
तुम्ही स्वतः जे आम्हाला देता, तेवढंच आम्ही गोळा करतो. वेबसाइटवरील सहकार्य किंवा संपर्क फॉर्म भरताना, आम्ही खालील माहिती गोळा करतो:
तुमचं नाव
तुमचा ईमेल पत्ता
तुमचा फोन नंबर, दिल्यास
तुमची संस्था, दिल्यास
तुम्ही मेसेजमध्ये लिहिलेली माहिती
आम्ही कोणतीही संवेदनशील वैयक्तिक माहिती गोळा करत नाही, आणि तुम्हीही फॉर्ममधून अशी माहिती पाठवू नये अशी विनंती आहे.
आम्ही info का गोळा करतो
तुमची माहिती आम्ही फक्त एका कारणासाठी वापरतो: तुमची चौकशी वाचण्यासाठी आणि त्याला उत्तर देण्यासाठी. बाकी काही नाही.
आम्ही तुमची माहिती मार्केटिंग ईमेलसाठी वापरत नाही, आणि तुम्ही स्वतः विचारल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही लिस्टमध्ये टाकत नाही.
आम्ही काय करत नाही
आम्ही तुमची माहिती कुणालाही विकत नाही.
आम्ही ती इतर कुणाच्या मार्केटिंगसाठी शेअर करत नाही.
तुम्हाला उत्तर देण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी आम्ही ती वापरत नाही.
भविष्यात कधी नव्या कारणासाठी वापरायची गरज पडली, तर आम्ही आधी तुम्हाला विचारू.
आम्ही काय करत नाही
आम्ही तुमची माहिती कुणालाही विकत नाही.
आम्ही ती इतर कुणाच्या मार्केटिंगसाठी शेअर करत नाही.
तुम्हाला उत्तर देण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी आम्ही ती वापरत नाही.
आम्ही ती किती काळ ठेवतो
तुमची चौकशी सोडवण्यासाठी लागेल तेवढाच वेळ, आणि त्यानंतर पाठपुरावा करण्यासाठी लागणारा योग्य कालावधी, आम्ही तुमची माहिती ठेवतो. लवकर डिलीट करायची असल्यास, फक्त सांगा.
तुमचे अधिकार
तुम्ही केव्हाही हे करू शकता:
आमच्याकडे तुमची कोणती माहिती आहे, हे विचारू शकता
ती दुरुस्त करायला सांगू शकता
ती डिलीट करायला सांगू शकता
माहिती ठेवण्याची तुमची संमती मागे घेऊ शकता
यासाठी hello@yashogatha.com वर संपर्क करा, आम्ही लगेच कार्यवाही करू.
कुकीज आणि अॅनालिटिक्स
आमची वेबसाइट किती लोक बघतात आणि कोणती पेजेस बघतात, हे समजण्यासाठी बेसिक अॅनालिटिक्स वापरू शकते. यामुळे वेबसाइट सुधारायला मदत होते. ही माहिती एकत्रित असते आणि तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाही.
इतर प्लॅटफॉर्मचे लिंक्स
आमची वेबसाइट YouTube, Instagram आणि WhatsApp कडे लिंक करते. तिथे गेल्यावर, त्या प्लॅटफॉर्मचं स्वतःचं गोपनीयता धोरण लागू होतं, आमचं नाही.
लहान मुलं
आमची वेबसाइट आणि कंटेंट सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी आहे. आम्ही जाणूनबुजून लहान मुलांची माहिती गोळा करत नाही. एखाद्या लहान मुलाने आम्हाला माहिती पाठवली आहे असं वाटल्यास, आम्हाला संपर्क करा, आम्ही ती डिलीट करू.
या धोरणातील बदल
आम्ही हे धोरण बदललं, तर या पानावरची तारीख आम्ही अपडेट करू.